कनक कोकण - एक आरोग्यदायी आस्वाद
कनक हा आयुर्वेदातील अतिशय महत्वाचा शब्द. कनक म्हणजे सुवर्ण, सोने , म्हणजेच शुद्धतेचे प्रतिक.
कोकण – म्हणजे निसर्गाचे सानिध्य आणि घाटकर कुटुंबियांचे जन्मगाव.
History
मार्च-2020 मध्ये कोरोनाच्या रुपाने आलेले जागतिक संकट आपणा सर्वांना आरोग्याबद्दल आणि प्रतिकारक्षमते बद्दल जागरूक करून गेले. सगळीकडे भीतीचे वातावरण असल्याने घरगुती उपाययोजना सर्वजण करीत होते. आम्ही घाटकर परिवार सुद्धा आयुर्वेदिक काढा, योगा, प्राणायम, पुरेशी झोप, इत्यादी सर्व प्रकार करत होतो. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य व पाचक आहाराचे सेवन आवश्यक होते. सौ. साक्षी गोविंद घाटकर यांनी आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी एक आरोग्यवर्धक लाडू तयार केला आणि त्याचे सेवन चालू केले. पुढे पुढे हा लाडू जवळचे मित्र व त्यांचे शेजारी यांनाही आवडला. या लाडूमध्ये गाईचे तूप, सेंद्रीय गुळ, ड्रायफ्रूट तसेच इतर आरोग्यवर्धक घटक असल्याने सर्वांना आवडला. आणि यातूनच एका घरगुती व्यवसायाला सुरवात झाली. सप्टेंबर 2020 मध्ये पहिले ग्राहक मिळाले.
सुरवातीला ओळखीच्या व्यक्तींना feedback साठी sample लाडू दिले. आलेल्या feedback नुसार सुधारणा करत हा व्यवसाय प्रगतीच्या दिशेने पुढे सुरु झाला. कोकणातील फणसाचे चिप्स आणि उकडीचे मोदक हे पदार्थ देखील या व्यवसायात विकण्यास आले. सर्व legal requirement सहित हा व्यवसाय दि. 30 जानेवारी 2021 रोजी कनक कोकण – ‘एक आरोग्यदायी आस्वाद’ या नावाने सुरु झाला. आमच्या सर्व ग्राहक, मित्र परिवार व शुभ चिंतक यांचे मन:पूर्वक आभार.
Vision & Mission
सौ. साक्षी गोविंद घाटकर व त्यांचा परिवार हा खिलाडू वृत्तीचा असल्याने, समाजामध्ये खेळ, आरोग्यवर्धक व्यायाम तसेच आरोग्यवर्धक पदार्थांचे सेवन यांच्या प्रसारासाठी कार्य करणे हा उद्देश्य समोर ठेवून आमच्या ग्राहकांना उत्तम, चविष्ठ व आरोग्यवर्धक पदार्थ पुरविणे तसेच समाजामध्ये सकारात्मक बदल घडविणे ह्यासाठी प्रयत्नशील राहणे हेच मिशन.
कनक कोकण ‘एक आरोग्यदायी आस्वाद’ हा एक घरगुती व्यवसाय 30 जानेवारी 2021 रोजी सुरु झाला. भाड्याच्या घरात हा व्यवसाय सौ.साक्षी गोविंद घाटकर ह्या एका गृहिणीने जिद्दीने सुरु केला. सुरवातीला आरोग्यवर्धक लाडू, फणसाचे चिप्स आणि त्यानंतर उकडीचे मोदक असे आरोग्यवर्धक पदार्थ बनवून विकण्याचा प्रयोग यशस्वी झाला. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे व व्यवसायाच्या चांगल्या गुणवत्तेमुळे हा व्यवसाय प्रगतीच्या दिशेने आज एका women entrepreneur च्या रूपाने पुढे येत आहे. ह्या व्यवसायाच्या founder President सौ. साक्षी गोविंद घाटकर ह्या अतिशय मेहनत करून व सातत्याने कार्य करीत व्यवसाय योग्य रीतीने पुढे नेत आहेत. या व्यवसायाच्या प्रगतीमध्ये सर्व नातेवाईक, व्यवसायिक मित्र आणि आमचे ग्राहक यांचे मोलाचे योगदान आहे.
मोदक
मोदक म्हणजे श्री गणपतीचा आवडता प्रसाद. याला सांस्कृतिक महान दर्जा आहे. भारतामध्ये सगळ्या शुभकार्यात तसेच गणेश चतुर्थी, विनायक चतुर्थी, संकष्ट चतुर्थी ह्या सगळ्या सणांमध्ये मोदक मोठ्या आवडीने आणि चविने घराघरात बनविला जातो. कनक कोकण तर्फे जेव्हा हा मोदक बाजारात आणला गेला तेव्हा त्यातील सांस्कृतिक महत्व राखून त्याला आरोग्यवर्धक बनविण्यात कनक कोकण यशस्वी झाले. आम्ही सेंद्रिय गुळाचा वापर करून हा मोदक एका वेगळ्याच स्वरूपात प्रस्तुत केला. आमचे सर्व ग्राहक हा मोदक फक्त सणापुरताच नाही, तर लग्नसमारंभ , वाढदिवस पार्टी, गेट टु गेदर यांसाठी Sweet dish म्हणून खाऊ लागले. विशेषतः गुळाचा असल्याने घरातील सर्वच जण आवडीने खाऊ लागले. गुलाबजामुन व जिलेबी यांसारख्या साखरेच्या पदार्थाला सुयोग्य पर्याय उपलब्ध झाला.
गाईचे साजूक तूप
सेंद्रिय गुळ
सेंद्रिय गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषकघटक असतात. सेंद्रिय गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी अनेक महत्वाची पोषकतत्वे असतात. सेंद्रिय गुळात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
खारीक
बदाम
काजू
मनुका
डिंक
जायफळ
अहळीव
ओवा
सुंठ
वेलची
सुके खोबरे
मेथी
खसखस
पिस्ता
गहू
ज्वारी
नाचणी
उडीद
मूग
हरभरा
नारळ
फणस
तांदूळ
Our Team
कनक कोकण Team!
Well Wisher's
achievements
गणेशोत्सव 2021 मध्ये कनक कोकण परिवाराने 11,111 मोदक वितरीत करून नवा उच्चांक गाठला !
PRODUCTS
जवळपास 15 पेक्षा अधिक आरोग्यवर्धक घटक असलेला हा आरोग्यवर्धक लाडू म्हणजे संपूर्ण कुटुंबाला प्रतिकारक्षमतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सुवर्णसंधीच आहे. या लाडू मध्ये गाईचे तूप, सेंद्रिय गुळ, ड्रायफुट्स व अनेक आयुर्वेदिक घटक आहेत. दिवसातून कोणत्याही एक लाडूचे सेवन आरोग्यास उत्तम.
- All
- आरोग्यवर्धक लाडु
- उकडीचे मोदक
- फणसाचे चिप्स
- दिवाळी फराळ
Testimonials
उकडीचा मोदक म्हटला की सुंदर पाकळ्यांचा , चविष्ट सारणाचा , आखीव रेखीव असाच डोळ्यांसमोर येतो. आणि चवीने खाणाऱ्याला तो तसाच लागतो ! सगळ्याना लागतो असाच ,पण करता कुठे येतो ? किंवा येत असेल तर वेळ कुठे असतो ? पण यासाठी कनक कोकण चे उकडीचे मोदक हा उत्तम पर्याय आहे. विकतच्या मोदकाच्सा सारणामधे जायफळ वेलदोड्याची चव “जरा जास्तच अपेक्षा” या सदरात मोडणारी ! पण कनक कोकण च्या सारणात ही चव प्रत्येक मोदकात ! याची नजाकत आपल्या जिभेवर रेंगाळे पर्यंत टिकली पाहिजे म्हणून पॅकींग ही उत्तम ! हे सगळे असले तरीही सांगीतलेली वेळ कधीही चुकली नाही ! इतक्या सगळ्या गोष्टी साध्य करायच्या असतील तर उत्तम कसब, ग्राहका प्रती निकोप दृष्टी, वेळेचे नियोजन, उत्तम नेतृत्व या सगळ्या गोष्टींचा मिलाप हवा हे जाणकारांना वेगळे सांगायलाच नको ! म्हणूनच कनक कोकण चे उकडीचे मोदक मला उत्तम वाटतात!
कनक कोकण चे उकडीचे मोदक आणि पौष्टिक लाडू (५ प्रकार) ही उत्पादने कनक कोकण च्या बोधवाक्य "एक आरोग्यदायी आस्वाद" ला पूर्णपणे न्याय देणारी आहेत. गुणवत्तापूर्ण पारंपरिक पद्धतीने बनविलेले उकडीचे मोदक आम्हाला एवढे आवडले की मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वीट म्हणून तेच वाटले आणि ते लोकांना अतिशय आवडले. स्वतः सौ साक्षी घाटकर आरोग्याविषयी जागरूक असल्याने कनक कोकणची उत्पादने ही त्यांचा ध्यास आहेत. कनक कोकण या ब्रँड ला मनापासून शुभेच्छा!